डोह, उदाहरणार्थ नेमाडेनंतर त्रिज्या २८ वर्षाच्या सोलापूरातील दिग्दर्शकाने मराठीचा डंका चीनमध्ये वाजवला आहे. सोलापूरमधील अकलूजच्या अक्षय इंडिकर या २७ वर्षीय तरूण दिग्दर्शकाच्या ‘त्रिज्या’ ह्या मराठी चित्रपटाला चीनमधील २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले. ‘न्यू एशियन टॅलेंट’सह शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘त्रिज्या’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या स्पर्धात्मक विभागांत निवडण्यात आला होता. छायांकन स्वप्नील शेटे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षयने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. तर छायांकन स्वप्नील शेटे यांनी केले आहे. ‘त्रिज्या’चे ट्रेलर कान चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आले होते. चित्रकथी निर्मिती, फिरता सिनेमा आणि बॉम्बे बर्लिन फिल्म प्रोडक्शन्स यांनी मिळून त्रिज्या चित्रपट बनवला आहे. बॉम्बे बर्लिन फिल्म्स हे इंडो-जर्मन प्रोडक्शन हाऊस कॅथरीन सॉकेल आणि आर्फि लांबा, चित्रपटात काम केले आहे, या दोघांनी मिळून सुरु केले आहे.

जगातील ११५ देशांच्या पाच हजार चित्रपटांमध्ये एखादा मराठी चित्रपट पहिल्या पाचामध्ये स्थान मिळतो हे आपल्यासाठी अभिमानास्पदच आहे. त्रिज्याच्या या यशाची दखल महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी पत्र लिहून घेतली. पत्रांमध्ये त्यांनी त्रिज्या आणि टीमचे कौतूक केले आहे. परदेशात कौतूक झालेल्या त्रिज्या हा चित्रपट जेंव्हा स्वतःच्या भाषेत राज्यात त्याची दखल घेतली जाते तो क्षण मोलाचा असतो असे अक्षय सांगते.

१८९१ साली सुरु झालेलं स्क्रीन इंटरनॅशनल मॅगझीनच्या मुख्य अंकात पहिल्या पानावर त्रिज्या चित्रपटाचा रिव्ह्यू आला आहे. सोशल मीडियावर त्रिज्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. सध्या वितरक शोधत आहेत, त्रिज्या चित्रपट भारतात लकरत प्रदर्शित होईल असे अक्षयने लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

पुण्याच्या एफटीआयआय अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेत असताना अक्षयने चित्रपट करायचे ठरवल्याचे अक्षयने सांगितले. तो म्हणतो, शिक्षण घेत असताना त्यावेळी डोक्यात अनेक विषय होते. जगाविषयी काही बोलण्यापेक्षा स्वत:विषयी काही वेगळं देता येईल का? हा विचार डोक्यात घोळत होता. जगाला संदेश देण्याऐवढे आपण मोठं नसतो.आणि कधी मोठं होतही नाही. आयुष्यभर आपण स्वत:ला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. स्वता:च्या आवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी आपण स्वताच्या आयुष्याची गोष्ट मांडावी का? असा विचार डोक्यात आला. पण हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यावरील बायोग्राफी नाही. तर हा सिनेऑटोबायोग्राफी म्हणायला हरकत नाही. कोणतीही चांगली कलाकृती आत दडलेल्या भावना. इच्छा, आकांशा, आठवणी किंवा स्वप्नामधून बाहेर येते. त्रिज्याचाही प्रवास तसाच सुरू झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay indikar trija in china film festival nck