बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियाडवाला हे चांगले मित्र आहेत. अक्षयने त्याच्या करिअरमध्ये साजिदच्या अनेक चित्रपटामध्ये काम केले होते. साजिदच्या एका नवीन प्रोजेक्टमध्ये अक्षय पुन्हा एकदा काम करणार आहे. तर पहिल्यांदाच अक्षय त्याचा सहकलाकार आणि मित्र सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या या चित्रपटावर काम सुरू आहे आणि लवकरच या चित्रपटाविषयी अधिक माहिती मिळेल. प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या स्रोताने हे सांगितले की हा एक अ‍ॅक्शनपट असेल ज्यामध्ये अक्षय आणि अहान पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. संपूर्ण टीम या चित्रपटासाठी खूप उत्साही आहे. या चित्रपटाची लवकरच घोषणा होईल अशा चर्चा आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आणखी वाचा : ‘त्या’ चित्रपटामुळे एक एक सामान विकावे लागले होते, जमिनीवर झोपायची आली होती वेळ – जॅकी श्रॉफ

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

दरम्यान, अक्षय सध्या साजिदचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. तर, अहान शेट्टी सध्या ‘तडप’ या चित्रपटात तारा सुतारियासोबत काम करत आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपट ‘आरएक्स १००’ चा हिंदी रिमेक चित्रपट असून साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मित करत आहे.

Story img Loader