एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली-२’ नंतर आता एस. शंकर यांचा सिनेमा ‘२.०’ जगभरात आपली कमाल दाखवण्यास सज्ज होतोय. ‘बाहुबली-२’ ने देशात आतापर्यंत सर्वांत जास्त कमाई करण्याचा किताब पटकावलाय आणि आता ‘२.०’ सुद्धा कमाईमध्ये मागे राहणार नाहीये. ‘२.०’ हा देशातील सर्वांत महागडा सिनेमा असल्याचं म्हटलं जातंय.

अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तब्बल १९० कोटी रुपयांची कमाई केल्याचे कळते. या सिनेमाने थिएटर राइट्स ८० कोटी रुपयांना विकलेत. इतकंच नाही तर सिनेमाचे सॅटेलाइट राइट्स ‘झी टिव्ही’ने ११० कोटी रुपयांना विकत घेतलेत. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची कमाई एकूण १९० कोटी रुपये इतकी झाल्याचं कळतं.

वाचा : ‘फोर्ब्ज’च्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत शाहरुख, सलमान, अक्षय कुमार</strong>

या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्याशिवाय अॅमी जॅक्सनसुद्धा भूमिका साकारणार आहे. याचा फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर पोस्टरसुद्धा प्रदर्शित झालाय. शंकर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात रजनीकांत दुहेरी भूमिका साकारणार असल्याचं आपल्या सर्वांनाच माहित आहे. यापूर्वी सिनेमातील अक्षय कुमारचा लूक सोशल मीडियावर लीक झाला होता. अक्षय कुमार यामध्ये एका दुष्ट शास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे. त्याचप्रमाणे नुकतेच अॅमी जॅक्सनचेही रोबोटच्या वेशभूषेतील फोटोदेखील लीक झाले.

सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख यापूर्वी दिवाळीदरम्यान असल्याची चर्चा होती मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. ४५० कोटींचा बजेट असलेला हा सिनेमा तेलुगू आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे