‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’ यांसारख्या सामाजिक विषयांवरील चित्रपटांनंतर अभिनेता अक्षय कुमार आणखी एका महत्त्वपूर्ण विषयावर काम करणार आहे. ‘पॅडमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या आगामी चित्रपटात अक्षय मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘महिला मंडल’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये विद्या बालन आणि निम्रत कौरसुद्धा झळकणार आहेत.

या चित्रपटाची कथा महिलांच्या अवतीभवती फिरणार असल्याचं शीर्षकावरून समजून येत आहे. भारताच्या मंगळयान मोहिमेवर बाल्की चित्रपट काढणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. या मोहिमेत महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानावर चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे ‘महिला मंडल’ हा चित्रपट मंगळयान मोहिमेवरच आधारित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ११ वर्षांनंतर अक्षय आणि विद्या स्क्रिन शेअर करणार आहेत. याआधी दोघांनी ‘हे बेबी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

jee main result
अरे व्वा! जेईई मेन परीक्षेत तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० गुण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश!
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?

वाचा : ‘तुला पाहते रे’ मालिकेतील ‘सौ. निमकर’ यांना निळू फुलेंकडून मिळाली ही शिकवण

सामाजिक विषयांवरील चित्रपट, प्रेरणादायी कथा यांसाठी अक्षय कुमार सर्वोत्तम अभिनेता असल्याचं म्हटलं जातं. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ या चित्रपटांच्या यशावरून हे सहज समजून येतं. त्यामुळे ‘महिला मंडल’सुद्धा बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या अक्षय ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर ‘महिला मंडल’च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.