डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘Into The Wild’ या सर्वाधिक लोकप्रिय शोमध्ये अलिकडेच अभिनेता अक्षय कुमारने हजेरी लावली होती. या शोमध्ये अक्षयने बेअर ग्रिल्ससोबत अनेक संकटांचा सामना केला. यावेळी संकटाला सामोरं जाण्याची अक्षयची पद्धत बेअरला आवडली असून ‘अक्षयला खिलाडी कुमार का म्हणतात याचा नेमका अर्थ समजला’, असं बेअरने म्हटलं आहे.

सोमवारी झालेल्या ‘Into The Wild’ च्या भागात अक्षय कुमारने हजेरी लावली होती. यावेळी अक्षयने बेअरसोबत जंगल सफारी केली असून जंगलात येणाऱ्या अनेक संकटांचा सामना केला. विशेष म्हणजे अक्षय झाडावर चढला,ज्या नदीत बऱ्याच मगरी होत्या, ती नदीदेखील तितक्याच धीटाईने पार केली. त्याच्यातील हे साहस पाहून बेअर भारावून गेला आणि अक्षयला खिलाडी कुमार का म्हणतात हे समजलं, असं तो म्हणाला.


दरम्यान, या शोमध्ये अक्षयला प्रोत्साहित करण्यासाठी ट्विंकल खन्ना आणि सुनील शेट्टी यांनी खास मेसेज देखील दिला. यात सुनील शेट्टीने अक्षयला शुभेच्छा दिल्या. अक्षयपूर्वी या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीदेखील सहभाग घेतला होता.