‘स्टार प्लस’ वाहिनीवर पुन्हा एकदा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा कॉमेडी शो सुरु होत आहे. या शोमध्ये अक्षय कुमार परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोसाठी त्याने शूटिंग सुरु केली असून सेटवरील एका अभिनेत्रीमुळे तो त्रस्त झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे या शोची निवेदिका एली अवराम.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, सेटवर एलीकडून होणाऱ्या चुकांमुळे अनेकदा रिटेक घ्यावे लागत आहेत. यामुळेच अक्षय वैतागला आहे. इतकंच नाही तर त्याने शोच्या निर्मात्यांना एलीसोबत काम करणार नसल्याचं सांगितलं आहे. एलीची आणि आपली शुटिंग वेगवेगळ्या वेळेत करण्यात यावी, असं त्याने निर्मात्यांना बजावलं आहे. एली पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. तिच्याकडून सातत्याने होणाऱ्या चुकांमुळे अनेक रिटेक घ्यावे लागत असल्याने बराच वेळ वाया जात असल्याची तक्रार त्याने केली आहे.

वाचा : ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक अपघातात जखमी; मदतीऐवजी पोलीस फोटो काढण्यात मग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळेच्या बाबतीत खिलाडी कुमारला कोणताच निष्काळजीपणा सहन होत नाही. वारंवार घेतल्या जाणाऱ्या रिटेकमुळे आपला बहुमूल्य वेळ वाया जात असल्याने अक्षयने निर्मात्यांना सक्त ताकीदच दिली आहे. तर एलीला हा शो अक्षयच्या शिफारशीमुळेच मिळाल्याची चर्चादेखील होती. एलीच्या जागी कॉमेडीयन सुनील ग्रोवरला ही जबाबदारी सोपवण्याचा विचार शोचे निर्माते करत होते.