आपला आगामी चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’चं प्रमोशन अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसतोय. ११ जून रोजी या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित होणार असून अक्षय रोज त्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करतोय. आणि नुकतंच त्याने एक नवीन पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात अक्षयच्या एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात तांबा (लोटा) दिसत आहे. या पोस्टरमध्ये ‘स्वच्छ आझादी’ असं टॅगलाईनदेखील लिहिलेलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या प्रकल्पाची प्रेरणा घेऊन हा सिनेमा काढण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. अक्षय कुमारने गुरूवारी ‘लोटा पार्टी तुमच्या भेटीला येत आहे’ असे कॅप्शन लिहिलेले एक पोस्टर शेअर केलं होतं. श्री नारायण सिंग दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी शाहरूख खानच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटासोबत अक्षयचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती होती. मात्र शाहरूखचा चित्रपट ७ दिवसांपूर्वीच म्हणजे ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी ही आनंदाचीच बातमी असेल.

 

VIDEO : ‘जग्गा जासूस’मधील ‘गलती से मिस्टेक’ गाणं प्रदर्शित 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा ट्रेलर ११ जूनला स्टार स्पोर्ट्सवर प्रदर्शित होणार आहे. सहकलाकार भूमी पेडणेकरसोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षयने याची माहिती दिली. या सिनेमात स्वच्छतेबाबत भाष्य करण्यात आले असून प्रत्येक घरात टॉयलेट असण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक घरात टॉयलेटची सुविधा असल्यास महिला आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतील असा संदेश यातून देण्यात आला आहे. चित्रपटाची संकल्पना अनोखी असल्याने अक्षय कुमार आणि त्याप्रमाणेच प्रेक्षकांनाही याकडून खूप अपेक्षा आहेत.