बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लॉकडाऊननंतर ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट आहे जो प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अक्षयच्या अभिनयाची स्तुती चाहते करत आहेत. मात्र, या सगळ्यात चित्रपट लीक झाल्याची बातमी समोर आली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अक्षयचा हा चित्रपट इंटरनेटवर फ्री डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे आणि ते सुद्धा एचडी प्रिंटमध्ये. तमिलरॉकर्स, फिल्मीवॅपसारख्या अनेक पाइरेटेड साइट्सवर ‘बेल बॉटम’ ऑनलाइन लीक झाला आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदा कोणता चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आणि तो लीक झाल्याने अक्षय आणि निर्मात्यांना धक्का बसला आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स व्हायरल
‘बेल बॉटम’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. करोना काळात ‘बेल बॉटम’च्या निर्मात्यांनी चित्रपटाला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तर अशा कठीण काळात चित्रपटाला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक सेलिब्रिटींनी निर्मात्यांचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे.
अक्षयच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटात त्याच्यासोबत लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरैशी देखील आहे. हा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती निर्माते जॅकी भग्नानी आणि दिपशिखा देशमुख यांनी केली आहे.