रस्त्याने जाताना आपण अनेकदा चित्रपटांचे, जाहिरातींचे होर्डिंग्ज पाहतो. अनेकदा दुकाने, बस, रिक्षा आणि सार्वजनिक ठिकाणी जाहिराती चिकटवलेल्या दिसतात. पण, काही जाहिराती या आपले विशेष लक्ष वेधून घेतात. रिक्षावरील अशीच एक जाहिरात अभिनेता अक्षय कुमारच्या नजरेत पडली आणि त्याने ती सोशल मीडियावर शेअर केली. विशेष म्हणजे रिक्षाच्या मागे लिहिलेलं वाक्य हा कोणता चित्रपट किंवा मोबाईलची जाहिरात नसून अनेकांसाठी महत्त्वाचा संदेश आहे.
वाचा : ‘बॉर्डर’मध्ये सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकलेली ‘ती’ अभिनेत्री आठवते का?
नेहमीच सामाजिक भान दाखवणाऱ्या अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत रिक्षाचा केवळ मागचा भाग दिसतो. पण, त्यावर लिहिलेला संदेश सर्वांचे लक्ष वेधतोय. रिक्षावर लिहिलंय की, ‘गंभीर रुग्णांसाठी मोफत सेवा.’ दरम्यान, या रिक्षावाल्याची कोणतीही माहिती अक्षयने दिलेली नाही. कदाचित त्याने गाडीने प्रवास करताना गाडीत बसून हा फोटो काढलेला असावा.
वाचा : आरोपींनाही मिळतो ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश, दाक्षिणात्य अभिनेत्री गहनाचा मोठा खुलासा
अक्षयने फोटोला कॅप्शन देत लिहिलंय की, रोजच्या जगण्यात आपला माणुसकीशी सामना होतो.
And just like that in everyday life you chance upon a little humanity 🙂 #DoGoodGetGood pic.twitter.com/7LpScILKxo
— Akshay Kumar (@akshaykumar) October 24, 2017