अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेटः एक प्रेम कथा या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. पण ट्रेलर येण्याचे प्रमोशनही अक्षय वेगळ्यापद्धतीने सोशल मीडियावर करतोय.

अखेर शिवगामीच्या व्यक्तिरेखेबद्दल श्रीदेवी बोलली

अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित करत ट्रेलर नेमकी कधी येणार ते सांगितले. या पोस्टरमध्ये काही महिला या हातात तांब्या (लोटा) घेऊन जाताना दिसत आहेत. या पोस्टरवर लोटा पार्टी तुम्हाला भेटायला येत आहे असेही लिहिले आहे. एक विनंती.. लौटा पार्टीला लोटा द्या, असे कॅप्शनही लिहिले आहे. येत्या तीन दिवसात ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’चा ट्रेलर येणार असल्याचेही अक्षयने कॅप्शनमध्ये सांगितले.

यापूर्वीही अक्षयने या चित्रपटाचे आणखी काही पोस्टर शेअर केले होते. दोन दिवसांपूर्वी अक्षयने ट्रेलर कधी येणार याचे काऊंट डाऊन सुरु केले होते. हे पोस्टर पाहून गाव, रेल्वे स्थानक, सिंगल स्क्रिन थिएटर अशा सगळ्यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. एकंदर काय, तर अक्षय चित्रपटांच्या पोस्टरसोबत एक मोठा संदेशही देतो आहे. हा संदेश तुम्ही आम्ही मनावर घ्यावा, शेवटी हाच तर अक्षयचा उद्देश आहे.

नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या प्रकल्पाची प्रेरणा घेऊन हा सिनेमा काढण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी सिनेमाचे नाव ऐकून मोदींच्या चेहऱ्यावर आलेले हासू त्यांना लपविता आले नव्हते असे त्याने सांगितले होते.

…आणि रजनीकांत अमृता फडणवीसांना भेटले

या सिनेमात स्वच्छतेबाबत भाष्य करण्यात आले असून प्रत्येक घरात टॉयलेट असण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक घरात टॉयलेटची सुविधा असल्यास महिला आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतील असा संदेश देण्यात आला आहे. अक्षयसोबत भूमी पेडणेकर या सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.