अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची मुलगी निताराचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अक्षयने सोशल मीडियावर तिच्यासोबतचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय आणि नितारा दिसतायेत. नितारा अक्षयच्या चेहऱ्यावर शेव्हिंग क्रिम लावताना दिसते. अक्षयने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले की, ‘दिवसभरातील माझा सर्वात उत्तम क्षण हाच असतो, जेव्हा माझी मुलगी माझी दाढी करते. अमुल्य क्षण, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू फक्त मोठी होऊ नकोस…’

पाच वर्षांच्या नितारासाठी अक्षय आणि ट्विंकलचं प्रेम तर सारेच जाणतात. दोघेही आपल्या मुलीला बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अक्षयला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो संपूर्ण वेळ मुलीसोबत घालवायला प्राधान्य देतो. एवढेच काय तर गोल्ड सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षयने निताराला आपल्यासोबतच ठेवले होते. जेव्हा ट्विंकल युरोप ट्रिपवर होती तेव्हा अक्षयच आपल्या मुलीची देखभाल करायचा.

हे काही पहिल्यांदा नाहीये की अक्षयने नितारासोबतचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले. याआधीही त्याने नितारासोबतचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी नितारासोबत बागेत खेळतानाचा एक व्हिडिओ त्याने शेअर केला होता. बाप-लेकींचा हा व्हिडिओ लाखोजणांनी पाहिला होता.

अक्षयच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, ‘पॅडमॅन’, ‘गोल्ड’ आणि ‘रजनीकांत’ यांच्यासोबतचा ‘२.०’ हे सिनेमे या वर्षी प्रदर्शित होणार आहेत.