बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटातून आणखी एक प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसांपासून याच चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चर्चा होण्यामागचे कारणही विशेष आहे. ‘पॅडमॅन’ चित्रपटात ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशिनची निर्मिती करणारे अरुणाचलम मुरुगानंथम यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे शीर्षकगीत नुकतेच प्रदर्शित झाले असून अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे.

एक सामान्य माणूस त्याच्या असामान्य कल्पनाशक्तीच्या आधारावर काय कमाल करू शकतो हे या गाण्यात आपल्याला पाहायला मिळेल. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेची झलकही यातील दृष्यांमध्ये पाहायला मिळते. गाण्यातील अक्षयचे संवादसुद्धा लक्षवेधी ठरतात.

shukra
धनाचा दाता शुक्र होणार अस्त, ‘या’ राशींना ७५ दिवस काळजी घ्यावी लागेल, होऊ शकते धनहानी
Shani Maharaj Will Shower Money Job Growth To These Three Rashi
२०२५ आधी प्रगतीचं शिखर गाठतील ‘या’ राशी’; शनीच्या कृपादृष्टीने जगतील राजेशाही जीवन, धनलाभही होईल बक्कळ
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?

‘द लेजंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’ या ट्विंकलच्या पुस्तकातील एका भागावर हा चित्रपट आधारित आहे. अक्षयसोबतच यामध्ये सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत झळकणार आहेत. पुढच्या वर्षी २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.