बॉलिवूडचा खिलाडी कुमार सध्या त्याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमारने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान स्वच्छतेच्या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली. उत्तरप्रदेश सरकारने ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाला राज्यभरात टॅक्स फ्री करण्याची घोषणा केलीये. अक्षयच्या भेटीनंतर योगी आदित्यनाथ यांनी हे आदेश दिलेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर अक्षयचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट आधारित असून तो टॅक्स फ्री करण्यासोबतच आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत योगी आदित्यनाथ हा चित्रपट पाहणार आहेत. या भेटीदरम्यानचा एक फोटो अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलाय. यावेळी लखनऊमधील स्वच्छता अभियानात अक्षय आणि भूमी पेडणेकरनेही हातभार लावला. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्याबरोबर स्वच्छतेची शपथ घेतली. लखनऊनंतर अक्षय आणि भूमी आग्राला जाणार आहेत.

Jab Harry Met Sejal Review : रिंग सापडली पण केमिस्ट्री हरवली

श्री नारायण सिंग दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारसोबतच भूमी पेडणेकर आणि अनुपम खेर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याआधी अक्षय आणि अनुपम यांनी ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.