खिलाडी कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. चित्रपटातील आणखी एक गाणं शुक्रवारी प्रदर्शित झालंय. ‘टॉयलेट एक जुगाड’ असं गाण्याचं शीर्षक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानापासून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलीये. उघड्यावर शौचास जाण्याच्या मुद्द्यावर चित्रपटातून भाष्य केलंय. अर्ध्या मिनिटाच्या या गाण्यातही यासंंबंधीचे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत.

‘भारतात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशातील ५४ टक्के लोक अजूनही उघड्यावर शौचालयाला बसतात. उघड्यावरील शौचामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी दोन लाख मुलांचा मृत्यू होतो,’ यांसारखे काही महत्त्वपूर्ण मुद्दे या गाण्यातून मांडण्यात आले आहेत. एकीकडे आपण चंद्रावर पोहोचलोय, डिजीटली प्रगत झालोय तरीही शौचालयांसाठी अजूनही आपण कशाप्रकारे झगडतोय हे या व्हिडिओतून अक्षय सांगण्याचा प्रयत्न करतोय.

PHOTOS : संजू बाबा साकारण्यासाठी रणबीरचा ‘पॉवर’फुल लूक!

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटात अनुपम खेर, दिव्येंद्रु शर्मा, सुधीर पांडे, शुभा खोटे यांच्याही भूमिका आहेत. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अक्षय आणि भूमी जोरदार प्रमोशन करत आहेत. अक्षयने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली असून त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे यावेळी लखनऊमध्ये अक्षय स्वच्छता अभियानातही सहभागी झाला.