भारतात आजही अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अनेक गावातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी कित्येक मैल चालत जावे लागते. महिल्यांची ही समस्या पाहता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार २१ किलोमीटर चालला आहे.

अक्षय कुमार Mission Paani Waterthon मोहिमध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान त्याने २१ किलोमीटर ट्रेडमिलवर चालून ज्या महिला आजही फक्त पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर चालत जातात त्यांच्यासाठी संदेश दिला आहे. मिशन पाणीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अक्षय कुमारचा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा- विराट कोहली, अभिनेत्री तमन्ना भाटियाला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अक्षय कुमार २१ किलोमीटर ट्रेडमिलवर चालला आहे कारण तो अशा महिलांच्या अडचणी समजू शकेल ज्या दररोज पिण्याच्या पाण्यासाठी २१ किलोमीटरपर्यंत चालत जातात’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे. सोबतच त्यांनी अक्षय कुमारचा फोटो देखील शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी अक्षयचा हा फोटो पाहून त्याचे कौतुक केले आहे.