‘स्टुडंट ऑफ दि इयर’ चित्रपटातून चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यापासून फार कमी कालावधीत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री आहे. आलियाने आतापर्यत अनेक हिट चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता लवकरच तिचा ‘राजी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटातील गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपटाचे कथानक १९७१च्या पार्श्वभूमीची असून आलिया एका महिला गुप्तहेराची भूमिका पार पाडणार आहे. या चित्रपटामध्ये आलियासह तिची आई सोनी राजदान या देखील स्क्रिन शेअर करणार आहेत.

Marathi Films Clash, Maharashtra Day, Nach Ga Ghuma, Swargandharva Sudhir Phadke, Theatres, IPL and Lok Sabha Election, marathi films, maharashtra din, 2 marathi movies clash, maharashtra din 2024, maharashtra day, entertaintment news, new marathi film,
‘महाराष्ट्र दिना’ च्या मुहूर्तावर दोन मराठी चित्रपट आमनेसामने
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

मुलीच्या लग्नात पित्याच्या आणि मुलीच्या मनातील घालमेल ‘दिलबरो’ या गाण्यात शब्दबद्ध केली आहे. त्यामुळे हे गाणे पाहताना प्रेक्षकांच्या  डोळ्याच्या कडाही पाणावतील हे निश्चित. या गाण्यामध्येच आलियाची रिअल लाईफमधील आई सोनी राजदान या दिसत असून त्यांच्या आणि आलियाच्या नात्याचंही सुरेख चित्रण केल्याचं पाहायला मिळत आहे. तर चित्रपटामध्ये आलियाच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणारे रजित कपूर हेसुद्धा एका खंबीर वडिलांच्या भूमिकेत शोभत आहेत.’दिलबरो’पूर्वी ‘राजी’मधील देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘ए वतन’ असे बोल असणारे हे गाणे अरिजीत सिंग याने गायले होते.