अभिनेत्री आलिया भट्टला करोनाची लागण झाल्यानंतर ती होम क्वारंटाइन होती. आलिया तिच्या क्वारंटाइन काळातील रोज वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. आज आलियाने एक फोटो शेअर करत अखेर तिची करोना चाचणी नेगेटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. चाचणी नेगेटिव्ह आल्याचा आनंद आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये झळकत आहे.
आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली आहे, “ही ती वेळ आहे ज्यात नेगेटिव्ह असंण चांगली गोष्ट आहे.” आलियाने शेअर केलेल्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद झळकत असल्याचं पाहायला मिळतंय. तर आलियाच्या या पोस्टवर अभिनेत्री दिया मिर्झा, कतरिना कैफ तसचं अभिनेते अनिल कपूर यांनी विविध इमोजी देत आनंद व्यक्त केला आहे. चाहत्यांनी देखील आलियाची चाचणी नेगेटिव्ह आल्याने आनंद व्यक्त केलाय.
View this post on Instagram
क्वारंटाइन असताना आलिया तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करत होती. या फोटोंमध्ये आलिया नाराज दिसत नसली तरी तिच्या चेहऱ्य़ावर आनंद दिसत नव्हता. मात्र अखेर करोना चाचणी नेगेटिव्ह आल्याने आलियाच्या चेहऱ्यावर आनंद खुलला आहे.
View this post on Instagram
येत्या काळात आलिया अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तिच्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ सिनेमांचं ट्रेलर रिलीज झालं असून चाहत्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलंय. तर एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ सिनेमातील तिच्या सीता या भूमिकेच्या लूकलाही चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. यासोबतच ती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात झळकणार आहे.