अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘कलंक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून या शूटिंगदरम्यान तिच्या पायाला दुखापत झाली आहे. अभिषेक वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचं शूटिंग अंधेरी इथं सुरू होतं. त्यावेळी पायऱ्यांवरून घसरल्याने तिच्या पायाला दुखापत झाली आहे. सध्या डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून शूटिंगचं व्यग्र वेळापत्रक असल्याने आलियाने सुट्टी घेण्यास नकार दिला आहे.

वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत आलिया ‘कलंक’चं शूटिंग करत होती. त्याचवेळी ती पायऱ्यांवरून घसरून पडली. चित्रपटाची स्टारकास्ट मोठी असल्याने यामध्ये आता संजय दत्तही सहभागी झाला आहे. त्यामुळे सर्वांच्या तारखांची जुळवाजुळव करता येणं पुन्हा शक्य होणार नसल्याने आलिया कामावर रुजू झाली आहे.

वाचा : लग्नाबाबतच्या प्रश्नावर रणबीरचं सूचक वक्तव्य

रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचीही शूटिंग सुरू असल्याने आराम करण्यासाठी तिला पुरेसा वेळ मिळत नाही आहे. तीन महिन्यांपूर्वी बल्गेरियामध्ये या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलियाच्या खांद्याला दुखापत झाली होती. सध्या या दुखापतीमुळे साहसीदृश्यांचं शूटिंग लांबणीवर टाकण्यात आलं आहे.

करण जोहरच्या आगामी ‘कलंक’ या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये सहा कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटासाठी माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन आणि आदित्य रॉय कपूर या कलाकारांची वर्णी लागली असून प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Story img Loader