अॅमेझॉन प्राइम ओरिजिनलवर ‘कॉमिकस्तान’ ही सीरिज खूप गाजली. या यशानंतर आता त्याचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कॉमिकस्तान’चं पहिलं पर्व प्राइम ओरिजिनलवर सर्वाधिक लोकांनी पाहिली होती. शिवाय देशभरातील प्रेक्षकांनी या सीरिजला दाद दिली.

क़ॉमिकस्तानच्या दुसऱ्या पर्वात सुप्रसिद्ध विनोदवीर झाकीर खान, तन्मय भट, बिस्व कल्याण रथ, कानन गिल, केनी सबॅस्टियन, कनिझ सुर्का, सुमुखी सुरेश आणि अबिश मॅथ्यू परतत आहेत. भारताचा नवा कॉमेडी स्टार बनण्याच्या या स्पर्धेत कॉमिकस्तानच्या पहिल्या पर्वात प्राइम ओरिजिनल सीरिजच्या नऊ एपिसोड्समध्ये देशभरातील दहा उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

वाचा : ‘…तर मग बॉलिवूड चित्रपटांच्या कथानकाबाबत तक्रार करू नका’; शूजित सरकार संतापला

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक व प्रमुख विजय सुब्रमण्यम याविषयी म्हणाले की, ‘कॉमिकस्तानच्या पहिल्या पर्वाने देशभरात अनेकांची मनं जिंकली. प्राइम व्हिडिओ लाँच झाल्यापासून सर्वाधिक पाहिली जाणारी अॅमेझॉन प्राईम ओरिजिनल सीरिज म्हणून या सीरिजने सर्व रेकॉर्ड तोडले. या सीरिजला आमच्या ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद हाच ग्राहकांकरिता दुसरे पर्व आणण्याच्या आमच्या उत्साहाचे कारण आहे.’

‘कॉमिकस्तान’च्या पहिल्या पर्वाबाबतची माहिती-

– कॉमिकस्तानने भारतातील अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आतापर्यंत सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या सीरिजचा विक्रम नोंदवला.
– लाँचनंतर साडेतीन तासांतच अनेकांनी कॉमिकस्तानचे पहिले चार एपिसोड्स पाहिले होते.
– लखनऊ, लुधियाना, जमशेदपूर, अहमदाबाद, कोची अशा शहरांतूनही या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला होता.