खुप वर्षांपूर्वी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांनी मराठी बांधवांना एक प्रश्न विचारला होता तुम्हाला कोण व्हायचंय? मुंबईकर, पुणेकर की नागपुरकर? हाच प्रश्न थोडा ट्विस्ट करुन अभिनेता अमेय वाघ तरुणांना विचारत आहे. तुम्हाला कोण व्हायचंय फेसबुककर, इन्स्टाकर, ट्विटरकर की टिक टॉककर?
सर्वाधिक वाचकपसंती – “एक्स गर्लफ्रेंड्सची नावं ऐकून पत्नी संतापते”; अभिनेत्याने सांगितला अनुभव
अमेय वाघ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तो सोशल मीडिया अकाउंट कसे वापरायचे याबाबत काही गंमतीशीर टिप्स देत आहे.
सर्वाधिक वाचकपसंती – “लग्न केलं ही बातमी आई-बाबांना सांगायला विसरलो”; अभिनेत्याने सांगितला तो किस्सा
पूर्ण video कुठे बघायला मिळेल हे तुम्हाला माहितीच आहे! #waghchaswag
तुम्हाला कोण व्हायचे आहे ? । विषय असा आहे । Amey Wagh | Kshitij Patwardh… https://t.co/SF89ZImP1d via @YouTube
— Amey Wagh (@ameywaghbola) May 11, 2020
इन्स्टाग्रामवर कुठलाही फोटो पोस्ट करताना काय खबरदारी घ्यायची. त्यावर स्टोरीज कशा अपडेट करायच्या? स्टेटस अपडेट करण्यासाठी कशा पद्धतीने विचार करायला हवा. अशा अनेक प्रश्नांची उत्तर अमेयने या व्हिडीओमार्फत दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तर आपल्या गंमतीशीर शैलीत या व्हिडीओसाठी अमेयचे आभार देखील मानले आहेत.