छोट्या पदद्यावरील कायम चर्चेत असलेला शो म्हणजेच ‘बिग बॉस’. यंदा मात्र ‘बिग बॉस’ दोन वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘बिग बॉस १५’ मधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे. यातील वूट सेलेक्ट या ओटीटी प्लॅटफऑर्मवर ‘बिग बॉस ओटीटी’ला सुरुवात झालीय. निर्माता करण जोहार या खास शोचा होस्ट आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये कोण स्पर्धक सहभागी होणार याची नावं आता समोर आली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर आता शिक्कामोर्तब झालं. कारण या शोमध्ये शमिता शेट्टीची एण्ट्री झालीय. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सामील होणारी शमिता ही पहिली महिला स्पर्धक आहे. राज कुंद्राच्या अटकेपासूनच शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शमिता शेट्टी या शोमध्ये सामील होण्याची शक्यता नाकारली जात असतानाच शमिताने मात्र शोमध्ये सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात एण्ट्री घेत असतानाच शमिताने या शोमध्ये सहभागी होण्यामागचं कारण सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot Select (@vootselect)

हे देखील वाचा: अभिनेते अनुपन श्याम यांचं निधन; योगी आदित्य यांनी उपचारांसाठी केली होती २० लाख रुपयांची आर्थिक मदत

शोमध्ये एण्ट्री घेताना शमिता शेट्टीने करण जोहरशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी कुटुंबावर आलेल्या कठीण काळातही तिने या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय का घेतला? या गोष्टीचा खुलासा केलाय. यावेळी आपण कुटुंबावर संकट येण्याआधीच शोसाठी कमिटमेंट दिली होती. ज्यावेळी सर्व काही सुरुळीत होतं तेव्हा कमिंटमेंट दिल्यानंतर अचानक माघार घेणं आपल्याला योग्य वाटत नसल्याने शोमध्ये सहभागी होत असल्याचं शमिता म्हणाली. यावेळी शमिताने शिल्पा शेट्टी किंवा राज कुंद्राचं नाव घेणं मात्र टाळलं.

या आधी देखील शमिता शेट्टी ‘बिग बॉस’या शोच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. मात्र काही दिवसातच शमिता शोमधून बाहेर पडली. शिल्पा शेट्टीच्या लग्नामुळे शमिताला शो सोडावा लागला होता.