सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतीच भारतीय महिला क्रिकेट संघाची माफी मागितली आहे. आता असे काय घडले की बिग बींना थेट माफी मागण्याची वेळ आली? तर बिग बींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय महिला क्रिकेट संघाला उद्देशून एक ट्विट केले होते. त्यामध्ये झालेली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत माफी मागितली. बिग बी क्रिकेटचे मोठे फॅन असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित असेल त्यामुळे क्रिकेटशी निगडीत घटनांवर ते कायमच आपले मत देतात, तसेच भारतीय संघाला प्रोत्साहनही देतात.


भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय आणि टी – २० सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेच्या ताकदवान संघाला हरवत भारतीय महिला संघाने ही मालिका आपल्या नावावर करुन घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यावेळीही अमिताभ बच्चन यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे भरभरुन कौतुक केले. पण हे करताना त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दक्षिण आफ्रिकेऐवजी ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला. सध्या ऑस्ट्रेलियाच्या संघाबरोबर भारत आपल्याच देशात खेळत असून दक्षिण आफ्रिकेला हरवून संघ परतला आहे.

बिग बींना आपल्या या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी लगेचच आणखी एक ट्विट करत भारतीय संघाची माफी मागितली आहे. कृपया ऑस्ट्रेलियाच्या जागी दक्षिण आफ्रिका असे वाचा अशी विनंती त्यांनी केली आहे. आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणा सगळ्यांकडेच असतो असे नाही. पण बिग बींनी हा मोठेपणा दाखवत माफी मागितली आहे. त्यामुळेच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

Story img Loader