बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांचे मत मांडत असतात. बऱ्याच वेळा अमिताभ अनेक चाहत्यांच्या कमेंट किंवा त्यांना पडलेल्या प्रश्नावर उत्तर देतानाही पाहायला मिळतात. नुकताच बिग बींनी ‘Selfie’ या इंग्रशी शब्दाला हिंदीमध्ये काय म्हणणार हे देखील सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ‘गेल्या काही दिवसांपासून मी Selfie या इंग्रजी शब्दाला हिंदी शब्द शोधण्याच्या प्रयत्नात होतो. मला अनेकांनी शब्द सुचवले मी त्या शब्दांशी पूर्णपणे सहमत नव्हतो. म्हणून आता मी स्वत: selfie या शब्दासाठी हिंदी शब्द तयार केला आहे आणि तो आहे – “वदय सह उसच….. व्यतिगत दूरभाषित यंत्र से हस्त उत्पादित स्व चित्र.

अमिताभ यांनी तयार केलेला शब्द वाचून कोणालाही असू येईल. पण चाहत्यांनी अमिताभ यांच्या क्रिएटीविटीला दाद दिली आहे. काहींनी त्यांच्या या ट्विटवर रिट्विट करत आणखी शब्द सुचवले आहेत. सध्या अमिताभ यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही यूजर्सने तर ‘सर फक्त स्व चित्र पण चालेल’ अशी कमेंटही दिली आहे.

सध्या अमिताभ ”कौन बनेगा करोडपती पर्व ११’ मध्ये व्यग्र आहेत. त्यानंतर अमिताभ करण जोहरच्या ‘ब्रह्मात्र’ चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात बिग बींसोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट, मोनी रॉय हे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.