बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे लाखो चाहते आहेत. चाहते कधी बिग बींच्या लूकची तर कधी बोलण्याची स्टाइल कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट शशिकांत पेडवाल डान्स करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच शशिकांत पेडवाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते अमिताभ बच्चन यांच्या स्टाइलमध्ये दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांच्या ‘ओम शांति ओम’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. शशिकांत यांची स्टाइल, हावभाव पाहून ते अमिताभ बच्चन असल्याचे भासत आहे. पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला देखील गोंधळायला होईल.

आणखी वाचा : सेम टू सेम! बॉलिवूड कलाकारांसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती

बिग बींच्या डुप्लिकेटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तो पाहून चाहते हैराण झाले आहेत. एका यूजरने कमेंट करत ‘तुम्ही आम्हाला गोंधळात टाकले. एका क्षणासाठी असे वाटले की हे अमिताभ बच्चन आहेत’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘सर तुम्ही अमिताभ बच्चन यांना भेटला आहात का? बच्चन यांचे आजवर अनेक डुप्लिकेट पाहिले. पण तुमच्यासारखं कोणी नाही’ असे कमेंट करत म्हटले आहे.

शशिकांत पेडवाल हे सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसतात. ते अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करत करोना रुग्णांचे मनोरंजनही करतात. ते व्हिडीओ कॉलच्या मदतीने करोना रुग्णांशी संवाद साधतात आणि मनोरंजन करत असतात.