छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाचा प्रोमो ट्विट केला आहे. परंतु या प्रोमोवरुन एका नवीनच वादाला तोंड फुटले आहे. लॉकडाउनच्या काळात चित्रीकरण झालेच कसे? असा प्रश्न विचारला जात आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “बॉलिवूडमध्ये कोणीही जबरदस्ती करत नाही”; अभिनेत्रींने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

सर्वाधिक वाचकपसंती – “एक नव्हे तर चार बॉयफ्रेंड हवेत”; टायगर श्रॉफच्या कथित प्रेयसीचा व्हिडीओ व्हायरल

वाढत्या प्रश्नांवर अमिताभ यांनी आपल्या अधिकृत ब्लॉगच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. “होय, आम्ही चित्रीकरण केलं. कोणाला त्याचा त्रास होतोय? जर त्रास होत असेल तर स्वत:पूरता मर्यादित ठेवा. खबरदार जर कोणी या चित्रीकरणाचा संबंध लॉकडाउनशी जोडाल तर. सर्व प्रकारची काळजी घेउनच आम्ही हे चित्रीकरणं केलं आहे. दोन दिवसांच काम आम्ही एका दिवसात संपवलं आहे.” अशा आशयाचा ब्लॉग अमिताभ यांनी लिहिला आहे. बिग बींचा हा ब्लॉग सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

या लिंकवर क्लिक करुन तुम्ही पूर्ण ब्लॉक वाचू शकता. – https://srbachchan.tumblr.com/

‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील सुपरहिट कार्यक्रम आहे. आमिताभ बच्चन या कार्यक्रमात होस्टचे काम करतात. या शोमध्ये स्पर्धकांना प्रश्न विचारले जातात. प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या स्पर्धकांना लाखो रुपये मिळतात. आता या शोचे १३वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.