बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत आहेत. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लेकाचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट पाहिला आणि सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाची प्रशंसा करत पोस्ट शेअर केली. ते पाहून नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अमिताभ यांनी ट्विटर अकाऊंटवर अभिषेकची एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट शेअर करत त्यांनी ‘WHTCTW मस्त मित्रा. वडिलांचा अभिमान. जेव्हा मुलगा वडिलांचे शूज घालायला लागतो तेव्हा तो तुमचा मुलगा नव्हे मित्र होतो. खूप चांगलं केलं मित्रा’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. या ट्विटमध्ये देखील त्यांनी “WHTCTW ” चा उल्लेख केला आहे. मात्र या मागचा नेमका अर्थ काय हे चाहत्यांना समजू शकलेलं नाही.

आणखी वाचा : दिशा पटाणीच्या हॉट फोटोवर राहुल वैद्यने केली कमेंट, म्हणाला…

अमिताभ यांची ही पोस्ट पाहून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने ‘तुम्ही हे काय केलं’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने ‘का मुलाची खोटी प्रशंसा करत आहात’ असे म्हणत बिग बींना ट्रोल केले आहे.

 

८ एप्रिल रोजी ‘द बिग बुल’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.