माहितीचा स्त्रोत म्हणून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ पाहिला जातो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. आता या शोचे तेरावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अमिताभ यांनी एका मुलाखतीत त्यांच्या घरी या शोला कसा प्रतिसाद मिळतो? आणि कोणा कोणाला हा शो आवडतो? ते सांगितले आहे.

अमिताभ यांनी ही मुलाखत २०१९ मध्ये दिली होती. या मुलाखतीत त्यांच्या घरात कोणाला हा शो आवडतो या विषयी अमिताभ यांनी सांगितले आहे. ‘हा शो घरात सगळ्यांना आवडतो. जया पाहते, काही काम असलं तरी ते सगळं सोडून ती हा शो पाहते. घरात सगळे हा खेळ सुद्धा खेळतात. कधी ऐश्वर्या खेळते तर कधी श्वेता. घरात बसून जर कधी कोणती प्रश्नावली असेल तर प्रत्येक व्यक्ती त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते,’ असे अमिताभ म्हणाले.

आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त

आराध्या हा शो पाहते का? असा प्रश्न विचारता अमिताभ म्हणाले, ‘हो ती सुद्धा पाहते आणि कधी कधी आम्ही घरी वेळ घालवण्यासाठी प्रश्न उत्तराचा खेळ खेळत असतो. त्यावर आराध्या ती त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते का असं विचारते असा हा खेळ असतो. हा घरातला खेळ आहे त्यात एवढं काही नाही. वेळ घालवण्यासाठी हा एक खेळ आहे.’