बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी अमिताभ चक्क एका महिलेच्या मोबाईल रिंगटोनमुळे चर्चेत आहेत. बिग बींनी डेंटिस्टकडे आपल्या दाताचा उपचार करण्याऱ्या एका महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा विनोदी व्हिडीओ पाहून तुम्ही देखील आपलं हसू रोखू शकणार नाही.
https://t.co/2M0d89P6bL
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 31, 2020
बिग बींनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये डॉक्टर महिलेच्या दातांचा उपचार करत आहे. तेवढ्यात या महिलेचा मोबाईल फोन खणाणू लागतो. या फोनची रिंगटोन ऐकून एकच खळबळ उडते. अचानक वाजलेल्या या रिंगटोनमुळे डॉक्टर आणि ती महिला दोघेही घाबरात. हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.