बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग्स शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनेक वेळा ते फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. आता त्यांनी सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत चाहत्यांमध्ये कशा प्रकारचा बदल झाला आहे हे त्यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा : “शिल्पामुळे आमचं लग्न मोडलं..”, पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या आरोपांवर राज कुंद्राने सोडलं मौन

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ त्यांच्या एका चाहतीला ऑटोग्राफ देताना दिसतं आहेत. त्यांच्या बाजूला शशि कपूर उभे आहेत. हा फोटो शेअर करत “आता ते दिवस गेले जेव्हा चाहते मला अशा प्रकारे प्रेम आणि आदर करायचे. या मुलीकडे बघा. आभारी असल्याचे व्यक्त करतं आहे. तिच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव बघा. आता फक्त इमोजी शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही भाग्यवान असाल तर,” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. अमिताभ यांच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : मनोज वाजपेयीची पत्नी शबानावर नाव बदलण्यासाठी टाकण्यात आला होता दबाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ लवकरच ‘ब्रम्हास्त्र’, ‘झुंड’, ‘चेहरे’, ‘मे डे’, ‘गुड बाय’ आणि ‘द इंटर्न’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. या व्यतिरिक्त छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती १३’चे सुत्रसंचालन करतं आहेत.