करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात कहर केलाय. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशा गंभीर परिस्थितीत कोणाला ऑक्सिजन सिलेंडर मिळतं नाही कोणाला औषध तर कोणाला बेड मिळतं नाही आहे. अशा गरजूंना मदत करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे आहे. करोनाच्या या लढाईत मदतीचा हात घेऊन ते पुढे आले. दरम्यान, अमिताभ यांनी करोनाकाळात कोणाला मदत केली नाही हे म्हणणाऱ्यांना त्यांनी आता उत्तर दिले आहे.
अमिताभ यांनी ब्लॉग मध्ये लिहीले की, “त्यांनी केलेल्या मदतीबद्ल सोशल मीडियावर चर्चा करणे त्यांना लाजिरवाणे वाटते. त्यांच्यासोबत होणारे गैरवर्तन आणि कमेंट करत केल्या जाणाऱ्या टीका या सगळ्या गोष्टी त्यांचे कुटुंब हे अनंत काळापासून सहन करत आहेत. त्यांनी दिल्लीत असलेल्या करोना फॅसिलीटीसाठी २ कोटींचे योगदान केले आहे.”
पुढे ते म्हणाले, “त्यानंतर माझ्या वैयक्तिक फंडाद्वारे सुमारे १५०० शेतकऱ्यांच्या बॅंकेतील कर्जाची भरपाई केली आणि त्यांना आत्महत्याकरण्यापासून थांबवले.”
पुढे अमिताभ म्हणाले, “ज्यांना कोणत्याही प्रकारच्या औपचारिकतेसाठी हरज राहणे शक्य नव्हते त्यांचा ट्रेनने जाण्याचा खर्च हा अमिताभ यांनी केला. गेल्या वर्षी, त्यांनी एक महिन्यासाठी संपूर्ण देशात ४ लाख कामगारांना जेवण दिले. एका शहरातील सुमारे ५ हजार लोकांना त्यांनी दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले आणि सोबतच त्यांनी मास्क, फ्रंटलाइन वर्कर्सला पीपीई किट दिल्या, पोलिसांच्या रुग्णालयात हजारोंमध्ये पर्सनल फंड्स दिले.”
दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांसाठी काय केलं? हे सांगताना बिग बी म्हणाले, “उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांना परतण्यासाठी त्यांनी ३० बस बूक केल्या आणि त्यांच्या रात्रीच्या प्रवासासाठी जेवणाचा आणि पाण्याचा पुरवठा केला, या सोबत ज्यांच्याकडे चप्पल नव्हते त्यांना चप्पल देखील दिल्या. मुंबई ते उत्तरप्रदेश अशी एक संपूर्ण ट्रेन बूक केली, ज्या ट्रेनमध्ये २८०० प्रवासी मोफत गेले. त्यासाठी मी पैसे दिले होते. आणि जेव्हा त्या राज्यांनी त्या लोकांना राज्यात येण्यावर बंदी केली, तेव्हा तातडीने ३ चार्टर्डे इंडिगो एअरलाईन विमानाने प्रत्येकी १८० प्रवास्यांना उत्तर प्रेदश, बिहार, राजस्थान आणि जम्मू-काश्मिरला पोहोचवले.”
अमिताभ पुढे म्हणाले, “त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी २० व्हेंटिलेटरची व्यवस्था केली असून ते सर्व व्हेंटिलेटर त्यांनी श्री रकाबगंज साहिब गुरुद्वारामध्ये उभारलेल्या सुविधेसाठी देणगी म्हणून दिले.”
पुढे ते म्हणाले, “संपूर्ण डायग्नोस्टिक सेंटर दान केले आहे.. जे दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीमार्फत दिल्लीच्या श्री बंगला साहिब गुरुद्वारा येथे उघडले आणि ज्यांनी करोनामध्ये त्यांचे आई-वडील गमावले अशा दोन मुलांना त्यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाचा १० वी पर्यंतचा खर्च ते पुरवणार आहेत.”