बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते चक्क करोना मास्कमुळे चर्चेत आहेत. खरं तर ‘मास्क’ हा इंग्रजी शब्द आहे. या शब्दाचे हिंदी भाषांतर बिग बींनी केलं आहे. हे भाषांतर वाचून तुम्ही देखील चकित व्हाल.

अवश्य पाहा – “…अन्यथा घराणेशाही थांबवणं अशक्य”; स्टार किडनेच केली बॉलिवूडची पोलखोल

अवश्य पाहा – “सर्वाधिक घराणेशाही बॉलिवूडमध्येच”; कुमार सानू यांनी व्यक्त केला संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मास्कला हिंदी मध्ये काय म्हणातात? किंवा त्याचे हिंदी अनुवाद करायचे असेल तर कसे कराल? असा प्रश्न बिंग बींनी चाहत्यांना विचारला होता. मात्र या प्रश्नावर कोणीही योग्य उत्तर दिलं नाही. अखेर बिंग बींच या गूढ प्रश्नाच उत्तर दिलं आहे. मास्कला हिंदीमध्ये “नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका” असं म्हणता येईल. हा अनुवाद वाचून नेटकरी चकित झाले आहेत. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.