बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी ते नेहमीच विविध प्रकारच्या पोस्ट करताना दिसतात. यावेळी बिग बींनी “माणसाच्या आयुष्यात शुभ मुहूर्त का इतका महत्वाचा आहे? हा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे.

अवश्य पाहा – ऐश्वर्या राय सारखी दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती आहे तरी कोण?

अवश्य वाचा – “बुलाती है मगर जाने का नहीं” ब्रेकअप करणाऱ्या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडचे भन्नाट उत्तर

काय म्हणत आहेत अमिताभ बच्चन?

“आपला जन्म मुहूर्ता शिवाय झाला आहे. आणि मृत्यू देखील मुहूर्ता शिवायच होणार हे आपल्याला माहिती आहे. तरी देखील आपण शुभ मुहूर्ताच्या मागे का पळतो? कोणी देऊ शकतं का याचं उत्तर?”

अवश्य वाचा – प्रेम शेअर करा पण ****** करु नका; पुणे पोलिसांकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ची टीप

अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा

असा प्रश्न अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून नेटकऱ्यांना विचारला आहे. या प्रश्नावर आतापर्यंत शेकडो ट्विटरकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मुहूर्त पद्धतीची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी अमिताभ यांच्यावर टीका देखील केली आहे.