बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरदेखील तितकेच सक्रीय असतात. त्यामुळे कोणत्याही विषयावर ते सहजपणे त्यांचं मत बेधडकपणे मांडत असतात. अलिकडेच त्यांनी थंडीविषयी एक ट्विट केलं असून सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे.

वयाची सत्तरी ओलांडलेले बिग बी आजदेखील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून ओळखले जातात. सध्या ते त्यांच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत आहेत. या चित्रीकरणासाठी ते लडाखला गेले होते. मात्र, तेथील हाडं गोठावणाऱ्या थंडीमुळे त्यांना परतावं लागलं आहे. या सेटवरील एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत असताना बिग बींनी जे कॅप्शन दिलं आहे, त्याची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

वाचा : ‘मिर्झापूर’मुळे अली फजलचा भाव वधारला; मानधनात केली इतकी वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लडाखला गेलो होतो, पण लगेच परत आलो. ३३ अंश सेल्सिअसचं तापमान. मी थर्मल सूट घातला होता. मात्र, हा सूटदेखील मला थंडीपासून वाचवू शकला नाही, असं कॅप्शन बिग बींनी या फोटोला दिलं आहे.दरम्यान, लडाखमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तेथे उणे ४० डिग्री तापमान असल्याचं सांगण्यात येत आहे.