उत्तम अभियासोबत सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. मराठी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविल्यानंतर अमृताने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. ‘राझी’, ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटामध्ये अमृता झळकली. या चित्रपटांनंतर चाहत्यांमध्ये तिचीच चर्चा असल्याचं दिसून येतं. किंबहुना मराठी इंडस्ट्रीपेक्षाही आता तिचं नाव बॉलिवूडमध्ये अधिक चर्चिलं जातंय. अमृता लवकरच ‘मलंग’ या चित्रपटात झळकणार असून यासाठी ती प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने तिचं वजनही कमी केलं आहे.

‘राझी’ या चित्रपटात अमृताने छोटेखानी भूमिका साकारली होती. मात्र तिच्या अभिनयाने अनेकांचं लक्ष वेधलं. त्यामुळेच तिच्या पदरात ‘मलंग’सारखा चित्रपट पडला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित मलंग या चित्रपटात अमृता झळकणार असून यात ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी अमृता कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी तिने तिच्या डाएट प्लानमध्येही काही बदल केलं असून व्यायामावर ती अधिक जोर देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#malang Styled by @nehachaudhary_ Dress @nayantaara

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 वाचा : स्ट्रीट डान्सर 3D : ‘या’ टिकटॉक स्टारवरुन तयार झाला वरुणचा लूक

‘मलंग’ हा नव्या वर्षातला बहुचर्चित चित्रपट असून अमृतासाठीही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.  हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील भूमिकेसाठी अमृताने तब्बल १२ किलो वजन कमी केलं आहे. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलर लाँचवेळी अभिनेता अनिल कपूर आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी यांच्यासह अमृतादेखील उपस्थित होती.