रजनीकांत आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘२.०’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली २’ नंतरचा देशातील सर्वांत महत्त्वाचा चित्रपट म्हणून याकडे पाहिलं जातंय. शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रजनीकांत दुहेरी भूमिका साकारणार असल्याचं आपल्या सर्वांनाच माहित आहे. चित्रपटाचं अधिकृत लूक प्रदर्शित होण्यापूर्वी यातील अक्षय कुमारचा लूक सोशल मीडियावर लीक झाला होता. अक्षय कुमार यामध्ये एका दुष्ट शास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे.
चित्रपटात रजनीकांत आणि अक्षय कुमारशिवाय अॅमी जॅक्सनसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील अॅमीच्या लूकविषयी फार गुपप्ता पाळण्यात आली होती. मात्र रोबोटच्या वेशभूषेतील अॅमीचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. मात्र आपण रोबोटची भूमिका साकारत नसल्याचे अॅमीने याआधीच स्पष्ट केले होते. ‘मी माझ्या भूमिकेविषयी फार काही सांगू शकत नाही. सध्या मी इतकंच सांगू शकेन की अशी भूमिका मी याआधी कधीच साकारली नव्हती’ असं अॅमीने म्हटलं होतं.
#2Point0 leaked still featuring @superstarrajini and @iamAmyJackson ! pic.twitter.com/GGXkPADf1z
— Saiganesh (@im_saiganesh) June 8, 2017
वाचा : मुलगा आर्यनमुळे आयफा सोहळ्याला मुकणार किंग खान?
अॅमीची नेमकी काय भूमिका असणार हे आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजू शकेल. प्रदर्शनाची तारीख यापूर्वी दिवाळीदरम्यान असल्याची चर्चा होती मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे २०१८ मध्ये हा चित्रपट १५ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ४५० कोटी बजेट असलेला हा देशातील सर्वांत महागडा चित्रपट आहे.