बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या धाकट्या लेकीचे १४ ऑगस्ट रोजी लग्न झाले. रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. तिच्या लग्नात फक्त जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती. त्यानंतर रिसेप्शनमध्ये ही त्यांनी थोड्याच लोकांना आमंत्रण दिले होते. त्यात निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खानने सुद्धा हजेरी लावली होती.

फराहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिल कपूर हे डान्स करताना दिसत आहे. ते सोनम कपूरच्या अभी तो पार्टी शुरु हुई है या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. एवढंच नाही तर नव वधू रिया देखील तिच्या वडिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. अनिल कपूर यांनी पिवळ्या रंगाचा कूर्ता परिधान केला आहे. तर रियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘या माणसावर माझे प्रेम आहे. मी पाहिलेला वडील आणि मुलीचा सगळ्यात चांगला डान्स,’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

अनिल कपूर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रियाने १४ ऑगस्ट रोजी रात्री लग्न केले. अनिल कपूर यांच्या जुहू मध्ये असलेल्या घरी लग्न झाले. रियाने बॉयफ्रेंड करण बूलानीशी लग्न केले आहे. रिया आणि करण हे दोघे गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

 

Story img Loader