छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांची आहे. हे दोघे ही सोशल मीडियावर नेहमीच कॉमेडी व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आता अनिताने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, यावेळी अनिता ट्रोल झाली आहे.

अनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिता आणि तिचा पती रोहित दिसत आहेत. रोहित बसलेला आहे तर त्याच्या पाठी अनिता उभी आहे. अनिता रोहितला बोलते की तिच्या हातात एक अदृश्य धागा आहे जो धागा ती रोहितच्या एका कानातून टाकून दुसऱ्या कानातून बाहेर काढेल आणि त्यानंतर एक जादू होईल. दरम्यान, व्हिडीओत अनिता रोहितला सांगते माझ्या हातात एक धागा आहे. तिने तो धागा रोहितच्या एका कानातून टाकला असून दुसऱ्या बाजुचे धाग्याचे टोक हे तिच्या हातात आहे. अनिता रोहितला विचारते तुला काही जाणवलं का तो नाही उत्तर देतो. तर अनिता म्हणते दुसऱ्याबाजूने तू धागा खेच. रोहित धागा खेचतो तर अनिता त्याला कानशिलात लगावते. त्यानंतर रोहित तिथून निघून जातो. अनिताने रोहितसोबत हा प्रँक केला आहे. “कृपया घरी करू नका,” अशा आशयाचे कॅप्शन देते अनिताने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

आणखी वाचा : “करीना, करिश्मा, अमृता आणि माझ्यात ही गोष्ट सारखी आहे…”, मलायकाने केला खुलासा

अनिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनिताला तिचा प्रँक आवडला असेल मात्र, नेटकऱ्यांना अनिताचा प्रँक आवडलेला नाही. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहताच अनिताला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला. “मुर्खपणा. नवऱ्याचा अपमान झाला. तुझा नवरासुद्धा तुझ्यासोबत असा विनोद करु शकतो का?” दुसरा नेटकरी म्हणाला, “ही ट्रीक मुळीच चांगली नाही, आशा आहे की तुझ्या नवऱ्याला वाईट वाटले नसेल.” तिसरा म्हणाला, “त्याला राग आला. मला आशा आहे की तुम्ही भांडत नसणार.”

Story img Loader