बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौतच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सज्ज झाली आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात अंकिता महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. यासाठी ती जोमाने तयारीला लागली असून सोशल मीडियावर बरेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसते. बॉलिवूडमध्ये कंगनाच माझी गॉडफादर असल्याचं अंकिताने यापूर्वी म्हटलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने कंगनाची बरीच प्रशंसा केली. तसेच कंगना या चित्रपटाची नायक असून मी नायिका असल्याचे विधानही तिने केले.

कंगनासोबत काम करताना अनुभव कसा असल्याचा प्रश्न अंकिताला विचारला गेला. त्यावर ती म्हणाली की, ‘सेटवर असताना ती पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करते. तुम्हाला सेटवर फक्त राणी लक्ष्मीबाईच दिसेल. कंगना या चित्रपटात हिरो असून तिने हिरोईन म्हणून मला लाँच केलं आहे. एखाद्याला लाँच करणं कठीण काम नाही, पण योग्य संधी देणं महत्त्वाचं आहे. ती योग्य संधी मला मिळाली आहे. मी चित्रपटात झलकारी बाईची भूमिका साकारत असून त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे.’

वाचा : माधुरी दीक्षित-रेणुका शहाणे तब्बल २३ वर्षांनी एकत्र येणार 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता साकारत असलेली झलकारी बाईची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लक्ष्मीबाईच्या सैन्यातील त्या महत्त्वपूर्ण व्यक्ती होत्या. राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत त्या नेहमी उभ्या असायच्या. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची संहिता ‘बाहुबली’चे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात ऐतिहासिक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.