छोट्या पडद्यासोबतच चित्रपटांमध्येही झळकलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. अंकिताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. नव्या आयुष्याची सुरुवात होत असल्याचं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
‘आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. या जुळ्यांच्या जन्मामुळे आमचं कुटुंब आणखी मोठं झालंय. अबीर आणि अबीरा तुम्हा दोघांचं स्वागत..’, असं कॅप्शन देत अंकिताने जुळ्या पाहुण्यांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. अंकिताच्या या फोटोवर कमेंट करत अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा : ‘अखेर ती वेळ आली’; पाच महिन्यांनी सोनाली परततेय मुंबईला
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामुळे अंकिता चर्चेत होती. सुशांतच्या आईचा फोटो पोस्ट करत अंकिताने भावना व्यक्त केल्या होत्या. सुशांत नैराश्यात जाणारा व्यक्ती नव्हता, हे ती वारंवार मुलाखतींमध्ये सांगत आली आहे. अंकिता आणि सुशांत जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.