प्रख्यात सतारवादक पंडित रवीशंकर यांची कन्या सतारवादक अनुष्का शंकरने घटस्फोट घेतला आहे. सात वर्षांच्या संसारानंतर अनुष्का दिग्दर्शक पती जो राईटपासून विभक्त झाली. २००९ मध्ये अनुष्का आणि जो यांची भेट दिल्लीत झाली होती. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा जगभर झाली होती. अनुष्का आणि जो जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमा निमित्ताने सातत्याने भेटायचे. याच भेटीदरम्यान त्यांच्यात प्रेम बहरत गेले. तीन महिन्यांनी दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. २६ सप्टेंबर २०१० रोजी लंडनमध्ये एका खाजगी सोहळ्यात दोघं विवाहबंधनात अडकले. त्यांना जुबीन आणि मोहन ही दोन मुलं आहेत.

https://www.instagram.com/p/BaRZ2USg8l9/

अनुष्काचा जन्म लंडनमध्ये झाला असून तिचं अधिकतर बालपण हे अमेरिका, यूके आणि भारतात गेले. अनुष्का शंकरला सतार वादनासाठी आतापर्यंत सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे. जो राईटने ‘प्राईड अॅण्ड प्रेज्युडाईस’, ‘इंडियन समर’सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. २००८ मध्ये जो राईटचा हॉलिवूड अभिनेत्री रोझमंड पिकेशी साखरपुडाही झाला होता. मात्र साखरपुड्याच्या काही महिन्यानंतरच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Anoushka Shankar (@anoushkashankarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.