‘अनुपमॉं’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली अनुपमाची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे रुपाली सतत चर्चेत असते. रुपालीचे लाखो चाहते आहेत. रुपाली सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रुपाली चाहत्यांच्या संपर्कात राहते. रुपालीने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत रुपालीने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या फोटोत रुपाली तिचा मुलगा रुद्रांशसोबत दिसत असून ते स्विमिंग पूलमध्ये आहेत. रुद्रांशचा वाढदिवस असल्याने ते त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. हा फोटो शेअर करत ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,’ असे कॅप्शन रुपालीने दिले आहे. रुपालीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर यावर नेटकरी रुपालीच्या मुलाला शुभेच्छा देत आहेत.
आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल
View this post on Instagram
आणखी वाचा : सलमानला विमानतळावर थांबवणाऱ्या CISF जवानावर कारवाई; मोबाइल जप्त
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली सध्या लोनावळ्यात पती आणि मुलासोबत आहे. तर, ‘अनुपमॉं’ या मालिकेत रुपाली अशा महिलेची भूमिका साकारत आहे जी तिच्या कुटुंबासाठी अनेक गोष्टींचा त्याग करते, कारण तिला एक चांगली आई आणि पत्नी बनायचे असते. या मालिकेतील रुपालीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.