गायिका अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे. या सोहळ्यास ब्रिटिश ऑल पार्टीचे संसद सदस्य, राजकारणी, एशियन रेडिओ तसेच यूकेमधील भारतीय संगीत क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिनिधी उपस्थित होते.

अनुराधा यांनी आजवर अनेक भारतीय भाषांमधील १५००हून अधिक गाणी गायली आहेत. या पुरस्काराबद्दल त्या सांगतात की, ‘८०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या ब्रिटिश संसदेत पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी खूपच आनंददायी बाब असून आजवरच्या श्रोत्यांच्या वाढत्या प्रेमामुळेच हे सर्वकाही शक्य होऊ शकले आहे. आपण केलेले कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असून त्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जात असल्याची जाणीव हा पुरस्कार स्वीकारताना होत आहे.’

Bigg Boss Marathi : ..म्हणून पुष्कर करणार चक्क लावणी!

शहीदांच्या कुटुंबांसाठी आणि गरीबांसाठी केलेल्या मदतीच्या कार्याबद्दल त्या म्हणतात की, ‘हे केवळ मी समाजाचे काही देणे लागते म्हणून मनापासून केलेले कार्य आहे. त्याबद्दल जास्त काही मी बोलू इच्छित नाही. समाजाप्रती आपली जबाबदारी असून सामाजिक कार्याद्वारे त्याची परतफेड करणे आपले कर्तव्य आहे असे मी मानते.’