आपल्या अत्यंत अनोख्या पद्धतीच्या चित्रपटांसाठी आणि चित्रपटांमध्ये व्यावहारिक दृष्टीकोन आजमवणारा प्रसिद्ध अभिनेता अनुराग कश्यप सध्या प्रेमात पडलाय. आपली पहिली पत्नी आरती बजाजला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री कल्की कोचलीनसोबत लग्न केलं. मात्र आता कल्कीसोबतही विभक्त झाल्यानंतर अनुराग पुन्हा एकदा आपल्यापेक्षा २१ वर्ष लहान मुलीच्या प्रेमात पडलाय.

४४ वर्षीय अनुराग कश्यप सध्या २३ वर्षीय शुभ्रा शेट्टीच्या प्रेमात आहे. गेल्या काही दिवसांत शुभ्रा शेट्टीसोबत अनुरागचे नातेसंबंध असल्याच्या चर्चा होत्याच. मात्र आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय. अनुरागने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शुभ्रासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

वाचा : …म्हणून अरबाज खानला ‘दबंग ३’चं दिग्दर्शन करायचं नाही !

अनुराग ‘देव डी’, ‘नो स्मोकिंग’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आणि ‘रमन राघव २.०’ यांसारख्या अनोखी संकल्पना असलेल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. २००३ मध्ये त्याने आरती बजाजसोबत लग्न केलं होतं आणि लग्नाच्या ६ वर्षांनंतर २००९ मध्ये घटस्फोट घेतला. त्यावेळीच अनुराग अभिनेत्री कल्कि कोचलीनला डेट करत होता. कल्कीने अनुरागच्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिकाही साकारली होती. २०११ मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि ४ वर्षांतच एकमेकांपासून विभक्तसुद्धा झाले. मागील वर्षभरापासून अनुराग आणि शुभ्रा शेट्टीच्या नातेसंबंधाबद्दल बी-टाऊनमध्ये अनेक चर्चा रंगल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुभ्रा २३ वर्षांची आहे आणि अनुराग कश्यपची मुलगी आलियापेक्षा फक्त ६ वर्षांनी मोठी आहे. आलिया कश्यप आता १६ वर्षांची आहे. अनुराग आणि शुभ्राने जरी अधिकृतरित्या आपल्या नात्याबद्दल सांगितले नसले तरी या फोटोंमधील दोघांचे प्रेम सहजपणे दिसून येतंय असं म्हणायला हरकत नाही.