आपले मत निडरपणे आणि स्पष्टपणे मांडण्यासाठी दिग्दर्शक अनुराग कश्यप ओळखला जातो. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘देव डी’ यासारख्या चित्रपटांसाठी नावाजला जाणाऱ्या अनुरागने आपल्या मित्रासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, यावेळी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करता त्याने अगदी शांतपणे आणि मुद्देसूद शब्दांत त्याच्या मित्राची बाजू मांडली. त्याचा हा मित्र म्हणजेच बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी.
Ye Re Ye Re Paisa Review वाचा : मनोरंजनाचा पाऊस!
अनुराग आणि नवाजुद्दीनमध्ये खूप चांगली मैत्री आहे. नुकताच अनुरागने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याचा नवाजच्या ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ’ या पुस्तकाभोवतीच्या वादावर प्रश्न करण्यात आला. त्यावर अनुरागनेही आपल्या मित्राची पाठराखण करण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. तो म्हणाला की, नवाजुद्दीन हा एक साधासरळ माणूस आहे. त्याला अजून दुनियादारी कळत नाही. त्याच्या मनात जे असतं तेच तो बोलतो. त्याचं बोलणं काहीजण चांगल्या अर्थाने घेतात तर काही त्याचा उलट अर्थ काढतात. खरंतर, पुस्तकात त्याने ज्या व्यक्तींचा थोडाफार उल्लेख केला आहे त्या स्वतःहून पुढे आल्या आणि त्यांनीच संपूर्ण घटना अधिक विस्तारीत केली. कदाचित लोक नवाजबद्दल गैरसमज करून घेत आहेत.
मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. त्यामुळे अनुरागच्या या वक्तव्यानंतर त्याने नवाजुद्दीनसोबतची त्याची मैत्री किती घट्ट आहे ते एका अर्थाने दाखवून दिले आहे.