अभिनेत्री अनुष्का शर्माने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही तिची ओळख निर्माण केलीय. सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका ऑडिशनचा आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अनुष्काने आमिर खानचा सुपरहिट सिनेमा थ्री इडियट्ससाठी दिलेल्या ऑडिशनचा आहे. अनुष्काने शाहरुख खानच्या ‘रबने बना दि जोडी’ या सिनेमातून मुख्य अभिनेत्रीच्या रुपात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. मात्र अनुष्काने थ्री इडियट्स या सिनेमासाठी देखील ऑडिशन दिलं होतं. या सिनेमात नंतर करीना कपूरची निवड करण्यात आली होती.

२०१४ सालात जेव्हा स्वत: अनुष्का शर्माने हा व्हिडीओ आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना दाखवला तेव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. सुरुवातीला दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना विश्वासच बसला नाही. अनुष्काने थ्री इडियट्ससाठी ऑडिशन दिलं नव्हतं असं ते म्हणाले. व्हायरल होत असलेला व्हिडीओ आमिर खानच्या ‘पीके’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. याचवेळी सेटवर अनुष्काने तिच्या थ्री इडियट्सच्य़ा ऑडिशनचा व्हिडीओ आमिर खान आणि राजकुमार हिरानीला दाखवल्याचं या व्हायरल व्हिडीओत दिसतंय. तसचं अनुष्काचं ऑडिशन पाहून आमिर आणि राजकुमार हिरानी यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं या व्हिडीओत दिसून येतंय.

हे देखील वाचा: ‘भाभीजी घर पर है’मधील अंगुरी भाभी इतकीच सुंदर आहे मनमोहन तिवारीची खऱ्या आयुष्यातील पत्नी!

हा व्हायरल व्हिडीओ ‘पीके’ सिनेमाच्या सेटवरचा आहे. पीके सिनेमात आमिर खान आणि अनुष्का शर्माची जोडी एकत्र झळकली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केलं होतं. याच सिनेमाच्या सेटवर अनुष्का शर्माने तिच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडीओ आमिर आणि राजकुमार हिरानी यांना दाखवला. यात अनुष्काने हिरव्या रंगाचं टॉप परिधान केलं असून ती खूपच लहान दिसतेय. तर हा व्हिडीओ पाहून आमिर खान आव्वाक झाला. सोबतच जुना व्हि़डीओ पाहून अनुष्का आणि राजकुमार हिरानी देखील हसू लागल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच वर्षांनी अनुष्का शर्माचं स्वप्न पूर्ण झालं

दरम्यान, २००९ सालात रिलीज झालेल्या ‘थ्री इडियट्स’ सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून करीना कपूरला कास्ट करण्यात आलं होतं.  अनुष्काला जरी ‘थ्री इडियट्स’ मध्ये राजकुमार हिरानी आणि आमिरसोबत काम करण्याची संधी मिळाली नसली तरी पाच वर्षांनी ‘पीके’ सिनेमाच्या निमित्ताने तिचं हे स्वप्न पूर्ण झालं.