‘खतरों के खिलाडी’ सीजन ११ मधील सगळ्यात तरूण स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन आज तिचा १९ वा वाढदिवस साजरा करतेय. अनुष्का तिचा यंदाचा वाढदिवस उदयपूरमध्ये साजरा करतेय. अनुष्काचा यंदाचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी एका स्पेशल ट्रिपचा प्लान केलाय. त्यामूळे तिच्या कुटुंबातील सर्वच जण तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उदयपूरमध्ये गेले आहेत.
अनुष्का सेनला तिच्या वाढदिवशी एक स्पेशल गिफ्ट मिळालंय. या स्पेशल गिफ्टचा एक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. तिने शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक लग्जरी वॉच दिसून येत आहे. हे स्पेशल गिफ्ट तिला तिच्या आई-वडिलांनी दिलेलं आहे. इन्स्टा स्टोरीतून तिने स्पेशल गिफ्टसाठी आई-वडिलांचे आभार देखील मानले.

इतक्या किंमतीचं आहे लग्जरी वॉच
अनुष्काच्या आई-वडिलांनी तिच्या वाढदिवशी जे लग्जरी वॉच गिफ्ट म्हणून दिलंय, त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल. ‘टिसॉट’ कपंनीचं हे लग्जरी वॉच असून त्याची किंमत ही ४० हजार इतकी आहे. आपल्या वाढदिवशी इतकं स्पेशल गिफ्ट मिळालं असल्याने अनुष्का सेन खूपच आनंदात आहे. हा आनंद तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय.
टीव्ही क्षेत्रात सगळ्या जास्त कमवणारी बालकलाकार
अनुष्का सेन गेल्या काही दिवसांपासून ‘खतरों के खिलाडी 11’ दिसून येतेय. अनुष्का सेन ही टीव्ही क्षेत्रातील सगळ्यात जास्त कमाई करणारी बालकलाकार ठरली होती. तिने २००९ मध्ये टीव्ही शो ‘यहां मैं घर घर खेली’मधून आपल्या अभिनयातील करिअरला सुरूवात केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ती वेगवेगळ्या टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. ‘बालवीर’ या मालिकेतून तिला बरीच लोकप्रियता मिळाली होती.