‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. बऱ्यचादा ती तिचे फोटो किंवा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळे अनुष्का कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते. परंतु यावेळी अनुष्काचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ चर्चेत आला नसून तिने केलेली कमेंट चर्चेत आली आहे. अनुष्काने चक्क स्वत:च्याच फोटोवर कमेंट केली आहे.

अनुष्काने अलिकडेच त्याच्या नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंपैकी एक फोटो अनुष्काला प्रचंड आवडला असून या फोटोवर तिने स्वत:च कमेंट केली आहे. “उंची चांगली आहे,# सेल्फलव्हर” अशी कमेंट अनुष्काने तिच्या फोटोवर केली आहे. विशेष म्हणजे तिची कमेंट पाहिल्यानंतर सोनम कपूर, आदिती राव हैदरी, जरीन खान आणि मौनी रॉय यांनीही कमेंट केली.

दरम्यान, आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ चित्रपटानंतर अनुष्का फारशी पडद्यावर झळकली नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र लवकरच ती क्रिकेटवर आधारित एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे.