काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ११ जानेवारीला अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हापासून विरुष्काच्या बाळाविषयी चाहत्यांना उत्सुकता होती. या चिमुकलीचा चेहरा पाहण्याची, तिचं नाव जाणून घेण्यासाठी चाहते आतूर झाले होते. त्यामुळे नुकतंच विरुष्काने त्यांच्या बाळाचं नाव जाहीर केलं. विशेष म्हणजे या बाळाचं नाव ऐकल्यानंतर त्या नावामागचा नेमकं अर्थ काय हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विराट आणि अनुष्काने त्यांच्या बाळाचं नाव वामिका असं ठेवलं आहे. खरं तर हे नाव ऐकल्यानंतर विराट आणि अनुष्का या दोघांचं नाव एकत्रित करुन वामिका हे नाव ठेवलं असावं असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र, या नावाचा एक खास अर्थ असून ते ठेवण्यामागे एक कारण आहे. We have lived together with love , presence and gratitude as a way of life but this little one , Vamika has taken it to a whole new level ! Tears , laughter , worry , bliss - emotions that have been experienced in a span of minutes sometimes ! pic.twitter.com/pOe2GQ6Vxi — Anushka Sharma (@AnushkaSharma) February 1, 2021 वामिका हे देवीचं नाव आहे. वामिका या नावाचा खरा अर्थ म्हणजे देवी दुर्गा. विराट- अनुष्काच्या घरात एका चिमुकलीने आगमन केल्यामुळे ती देवीचं रुप आहे असं म्हणत त्यांनी या चिमुकलीचं नाव वामिका ठेवलं आहे. विराटपाठोपाठ आणखी एक क्रिकेटपटू झाला बाबा; शेअर केला Photo अलिकडेच अनुष्काने विराट आणि तिच्या लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सोबतच तिच्या बाळाचं नावदेखील जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. “आमच्या मुलीने, वामिकाने आमचे आयुष्य एका वेगळ्याच स्तरावर नेले आहे! अश्रू, हसू, काळजी, आनंद या सगळ्या भावना काही मिनिटांच्या कालावधीत आम्ही अनुभवल्या आहेत” या आशयाचे ट्वीट अनुष्काने केले.