भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली लाखो तरुणींच्या मनावर राज्य करतो. मैदानातील खेळीपासून विराटच्या लूकपर्यंत तरुणी त्याच्यावर घायाळ आहेत. पण, काल या क्रिकेटपटूने अनेक तरुणींची मनं दुखावली. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने इटलीत डेस्टिनेशन वेडिंग करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विरुष्काच्या लग्नाचे वृत्त समोर येताच सोशल मीडियावरून या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रेसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्
विराटच्या फॅनफॉलोविंगमध्ये तरुणींचाच समावेश अधिक आहे, हे काही वेगळे सांगायला नको. आजपर्यंत कित्येक जणींनी विराटला लग्नाची मागणीही घातली होती. त्याच्या या चाहतींमध्ये एका महिला क्रिकेटपटूचाही समावेश आहे. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील डॅनियल वेटने विराटला थेट लग्नाची मागणी घातली होती. तीन वर्षांपूर्वी तिने विराटला प्रपोज केले होते. पण अनुष्कावर जीव जडलेल्या विराटने डॅनियलकडे दुर्लक्ष केले.
Inside videos : विराट-अनुष्काच्या साखरपुड्यापासून लग्नाचा व्हिडिओ
डॅनियलने ४ एप्रिल २०१४ ला एक ट्विट केले होते. त्यात तिने लिहिलं की, ‘विराट माझ्याशी लग्न कर.’ त्यावेळी हे ट्विट बरेच चर्चेत आले होते. विराट-अनुष्काच्या लग्नानंतर आता डॅनियलने पुन्हा एकदा ट्विट केले. मात्र, यावेळी तिने अभिनंदन एवढेच लिहले. त्यानंतर आणखी एक ट्विट करून रडण्याच्या स्मायली टाकण्यासही ती विसरली नाही.
Congratulations @imVkohli & @AnushkaSharma
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) December 11, 2017
https://t.co/8akAs8ZEKb
— Danielle Wyatt (@Danni_Wyatt) December 11, 2017
Kholi marry me!!!
— Danielle Wyatt-Hodge (@Danni_Wyatt) April 4, 2014