गेल्या आठवड्यापासून क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाचीच चर्चा पाहायला मिळतेय. त्यांचे गुपचूप डेस्टिनेशन वेडिंग करणे असो, त्यांच्या लग्नाचे फोटो असो किंवा विरुष्काच्या लग्नात मोजून केवळ ४४ पाहुण्यांचे उपस्थित राहणे असो या लग्नाची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट चर्चेचा विषय ठरतेय. सध्या या दोन्ही सेलिब्रिटींच्या चाहत्यांचे लक्ष त्यांच्या हनीमून फोटोने वेधले आहे. त्याच दरम्यान, या शाही विवाहसोहळ्यातील काही आतल्या गोष्टीही बाहेर पडत आहेत.

TOP 10 NEWS : मनोरंजन विश्वातील ठळक घडामोडी, गॉसिप फक्त एका क्लिकवर

११ डिसेंबरला विरुष्का इटलीमधील टस्कनी येथे विवाहबद्ध झाले. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना विराट आणि अनुष्काने रिटर्न गिफ्टही दिले. या ‘सेलिब्रिटी कपल’च्या वेडिंग प्लॅनरने नुकतीच यासंबंधीची माहिती एका मुलाखतीत दिली. विराट आणि अनुष्का दोघंही धार्मिक आहेत. तसेच दोघंही प्रसिद्ध कवी आणि संत रुमी यांचे आणि त्यांच्या कवितांचे मोठे चाहते आहेत. म्हणूनच त्यांनी त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून रुमींच्या कवितांचे पुस्तक भेट दिले.

VIDEO : बिग बी ऐश्वर्याला म्हणतात, ‘आराध्यासारखे वागू नकोस’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट आणि अनुष्काने त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळींसाठी २१ डिसेंबरला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन आयोजित केले आहे. सध्या हे जोडपे सुट्टीसाठी परदेशात गेले आहे.